Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणुक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गणेश चव्हाण आघाडीवर...

नशिराबाद नगरपरिषद निवडणुक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गणेश चव्हाण आघाडीवर ; मतदारांचा कमालीचा प्रतिसाद.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश चव्हाण यांनी प्रचारात लक्षणीय अशी आघाडी घेतली असून मतदारांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक मतदारही त्यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी गावात परतले असून त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेतल्याने चव्हाण यांच्या प्रचारात नवीन ऊर्जा संचारलेली दिसते.

राजकीय वारसा नसूनही सामान्य कुटुंबातून आलेल्या गणेश चव्हाण यांचे नाव नशिराबादच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहे. स्थानिक लोकांच्या आरोग्याबाबत ते सातत्याने कार्यरत राहिले असून अत्यावश्यक काळात रुग्णांना वैद्यकीय खर्चापासून ते अन्य मदतीपर्यंत त्यांनी केव्हाही हात पुढे केला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेली गरजू रुग्णांची सेवा, तसेच राज्यातून स्थलांतरित होणाऱ्या परप्रांतीयांना जेवण, पाणी व निवाऱ्याची केलेली सोय यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली.समाजातील समस्यांचे निराकरण करण्याची त्यांना विशेष आवड असून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मार्गदर्शन आणि शिफारस करून त्यांनी अनेकांना दिलासा दिला आहे.

नशिराबाद नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश चव्हाण प्रचारात आघाडीवर ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी प्रचाराच्या दृष्टिकोनातून शहरात तसेच वॉर्डांत मोठ्या सभा टाळत कॉर्नर मीटिंग्सवर भर दिला असून चौकाचौकांत आयोजित केलेल्या छोट्या बैठकीतून ते थेट मतदार संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचे नाव चर्चेत येत असल्याने त्यांच्या प्रचाराच्या या पद्धतीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण प्रचार योजनेचे नियोजन ते स्वबळावर करत असून त्यांच्या संघटन कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या पार्श्वभूमीवर नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची लढत अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित झाले असून चव्हाण यांच्याकडून महायुतीला काट्याची टक्कर मिळेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या