Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभाग ६ (अ) मधून सौ. ज्योत्स्ना उल्हास चौधरी...

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभाग ६ (अ) मधून सौ. ज्योत्स्ना उल्हास चौधरी यांची दमदार उमेदवारी

शिवसेनेचे अनुभवी कार्यकर्ते उल्हास चौधरी यांचा राजकीय अनुभव त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून सर्वसाधारण जागेसाठी सौ.ज्योत्स्ना उल्हास चौधरी यांनी उमेदवारी दाखल करून लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पतींना व प्रतिष्ठित नेते उल्हास चौधरी यांच्या वीस वर्षाचा संघटनात्मक प्रवासाचा त्यांना भक्कम राजकीय वारसा लाभला असून, त्या वारसाला सक्षम नेतृत्वाची जोड मिळत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.

1998 पासून सातत्यपूर्ण शिवसेना बांधणीचे कार्य…
उल्हास चौधरी यांनी 1998 पासून शिवसेनेत विविध जबाबदाऱ्या निभावत शहर उपाध्यक्ष, तसेच तालुका विभाग प्रमुख म्हणून काम केले. त्या काळात शिवसेनेचे गावातील अस्तित्व अत्यंत क्षीण होते. मात्र चौधरी यांनी खालचीआळी ते वरच्या आळी पर्यंत शिवसेनेच्या १४ शाखांची स्थापना करून संपूर्ण गावात संघटन उभे केले.त्यांनी आदरणीय आमदार दिलीप भाऊ भोळे तसेच नंतर 2006 पासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्ताराला गती दिली.

सामाजिक बांधिलकी ; शिवजयंती उत्सव ते विद्यार्थ्यांना प्रेरणा
नशिराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवजयंती उत्सव सुरू करून हिंदू बांधवांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम चौधरी दाम्पत्याने केले. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन, प्रेरणा आणि शैक्षणिक वातावरण घडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

सौ. ज्योत्स्ना चौधरी यांची गावची जन्मओळख, माहेर यामुळें सर्वांना जवळून ओळख

सौ.ज्योत्स्ना चौधरी या मूळच्या नशिराबादच्या असल्याने त्यांचे सासर आणि माहेर एकच असल्याने त्यांना गावाची, परिसराची आणि प्रत्येक घराघरातील समस्या व्यक्तीशः माहिती आहे. सामाजिक कार्यात त्या नेहमीच पुढाकार घेत असून, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत शासकीय स्तरावर पाठपुरावा करतात.त्यांचे एम.ए., एम.सी.एम. असे उच्च शिक्षण प्रभाग आणि शहराच्या विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

‘ट्रॅक्टर’ चिन्हावर शिक्का ; विकासाला गती देणारा निर्णय

प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून सौ. ज्योत्स्ना चौधरी यांनी ‘ट्रॅक्टर’ या निवडणूक चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. शहर व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, सुशिक्षित आणि लोकाभिमुख प्रतिनिधी म्हणून त्यांना विजयी करावे, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे.ट्रॅक्टर निशाणी ही विकास, प्रामाणिकपणा आणि प्रगतीची ओळख ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सौ. ज्योत्सना उल्हास चौधरी यांची उमेदवारी ही त्यांच्या प्रभागासाठी अनुभवी नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, उच्चशिक्षित दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यांची सांगड घालणारी ठरल्याचे चित्र नशिराबादमध्ये दिसून येत आहे. त्यांच्या विजयाने प्रभाग ६ (अ) च्या विकासाला निश्चितच बळ मिळेल, असे नागरिकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या