Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमधरणगाव-चोपडा रोडवर आयटीआयजवळ साडेसात किलो गांजा जप्त.

धरणगाव-चोपडा रोडवर आयटीआयजवळ साडेसात किलो गांजा जप्त.

एकजण ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.

धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरालगतच्या धरणगाव-चोपडा रस्त्यावरील शासकीय आयटीआय जवळ साडेसात किलो गांजा जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (३ डिसेंबर) रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकासह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, कॉन्स्टेबल दीपक माळी, रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, दीप पाटील आणि किशोर भोई यांनी ही संयुक्त कारवाई केली.पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून सुमारे साडेसात किलो वजनाचा गांजा जप्त केला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या