Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दत्त जयंती उत्साहात ; महाप्रसाद वाटप.

नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दत्त जयंती उत्साहात ; महाप्रसाद वाटप.

स्व. रजनीताई महाजन यांच्या मुलीला शैक्षणिक व आर्थिक मदत.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस स्टेशनतर्फे दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी साडेआठ वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश शिंदे व त्यांच्या पत्नींच्या हस्ते मंदिरातील श्री दत्त मूर्तीचे अभिषेक, मंत्रोच्चार व आरती संपन्न झाली. त्यानंतर पंचकोशीतील नागरिकांसाठी दुपारी बारा वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस स्टेशनतर्फे स्वर्गवासी होमगार्ड रजनीताई महाजन यांच्या मुलीस शैक्षणिक व आर्थिक मदतीसाठी रु. ३०,००० देण्यात आले. रजनीताई यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याच्या उद्देशाने पोलीस कर्मचारी व होमगार्ड वृंदाने ही मदत पुढाकाराने दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे, उपनिरीक्षक विजय कोळी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्याने दत्त जयंती उत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या