जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात शनिवार, ६ डिसेंबर रोजी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, ज्येष्ठ शिक्षिका पद्मजा जोशी, संगीता कुलकर्णी, रोहिणी प्रचंड, रेवती किन्हीकर तसेच ज्येष्ठ शिक्षक आनंदा चौधरी, जगदीश साळुंखे, सोमनाथ महाजन उपस्थित होते. कार्यालय प्रमुख प्राजक्त प्रचंड आणि ग्रंथालय प्रमुख सुनील अंबिकार यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य, विचार आणि संघर्षातून प्रेरणा घेऊन ते आचरणात आणण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला. हा उपक्रम मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, जगदीश साळुंखे, ए. व्ही. चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी पार पडला.

