Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईम20 हजाराची लाच मागितल्याने हवालदार एसीबीच्या सापळ्यात ; गुन्हा दाखल

20 हजाराची लाच मागितल्याने हवालदार एसीबीच्या सापळ्यात ; गुन्हा दाखल

निंभोरा (ता. रावेर) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जावरून गुन्हा नोंद होऊ नये यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुरेश पवार असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव आहे.तक्रारीनुसार, शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल घेऊन तो दिल्ली येथील व्यापाऱ्यांना विकण्यात आला होता. मात्र, त्यांचे पैसे शेतकऱ्यांना न दिल्याने त्यांनी तक्रारदाराविरुद्ध अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदारांना निंभोरा पोलीस स्टेशन येथे बोलावले होते.

तक्रारदारांनी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत, हवालदार पवार यांनी तक्रारदाराविरुद्ध गुन्हा नोंद न करण्यासाठी तक्रार अर्जात नमूद रकमेच्या १० टक्के म्हणजेच २० हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच ही रक्कम संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना द्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले होते.ACB च्या तपासानंतर हवालदार सुरेश पवार यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक (लाचलुचपत) योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, संगीता पवार, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, भूषण पाटील यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या