Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगर परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय ; योगेश पाटील नगराध्यक्षपदी...

नशिराबाद नगर परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय ; योगेश पाटील नगराध्यक्षपदी विजयी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. नगर परिषदेच्या सदस्य निवडणुकीत महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली असून महायुतीच्या उमेदवारांनी सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच महायुती पुरस्कृत एका उमेदवाराचाही विजय झाल्याने महायुतीकडे एकूण १४ जागांचे संख्याबळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विजयी दिग्गज उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या लीना महाजन, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच कीर्तिकांत चौबे यांचा समावेश आहे. तर शिवसेनेचे शहर प्रमुख विकास धनगर यांनी वॉर्ड नंबर १० मधून बंडखोरी करीत त्यांच्या पत्नीचा अपक्ष अर्ज दाखल केला होता. या जागेवर भारताबाई विकास धनगर या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत.

दरम्यान, नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवारांनी दोन जागांवर विजय मिळवला असून एमआयएम पक्षाचे उमेदवारही दोन जागांवर विजयी झाले आहेत. या निकालामुळे नशिराबादच्या नगर परिषदेवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नशिराबाद नगरपरिषद नगरसेवक पदासाठी विजयी उमेदवारांची नावे 

नगराध्यक्ष:- योगेश नारायण पाटील नगरसेवक:- lनारखेडे कोमल प्रशांत, महाजन लीना पंकज, पाटील मनोज चंद्रकांत, हिना बी मो रईस कासार, सय्यद वासीफ अली सय्यद निसार अली, शाह हनीफा बी मोहम्मद खलील, शेख असलमोद्दिन एजाजोद्दीन, व्यवहारे शैला कैलास, चौबे कीर्तीकांत पंडित, महाजन सुवर्णा सचिन, पाटील लालचंद प्रभाकर, रंधे जनाबाई भगवान, बऱ्हाटे चेतन दगडू, शेख नसरीन बानो मुश्ताक, मोहम्मद इक्बाल शेख इब्राहीम, मण्यार  कमरुनिसा सय्यद बिस्मिल्ला, मन्यार आसीफ शेख गनी शेख, धनगर भारताबाई विकास, पाटील विकास गणपत

Share मल्ला

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या