Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगर परिषद निवडणुकीत विजयी उमेदवाराला किती मते, तर पराभूत उमेदवाराला किती...

नशिराबाद नगर परिषद निवडणुकीत विजयी उमेदवाराला किती मते, तर पराभूत उमेदवाराला किती मते मिळाली? सविस्तर माहिती… थोडक्यात आपल्यासाठी..!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषद निवडणूक 2025 नुकतीच पार पडली असून कालच या निवडणुकीचा निकालही लागला. नगराध्यक्ष तसेच नगरसेवकाच्या २० जागांसाठी घेण्यात असलेल्या या निवडणुकीत नशिराबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर महायुतीतर्फे योगेश पाटील यांनी विजय मिळविला असून नशिराबाद नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष पदाचा मान त्यांना मिळाला आहे. महायुतीने १३ जागा जिंकल्या असून, भाजप पुरस्कृत १ अपक्ष असे मिळून एकूण १४ जागा घेऊन स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना २ जागेवर समाधान मानावे लागले. अपक्षांनी २ जागा जिंकल्या असून, त्यातील एक जागेवर शिंदे सेना शहर अध्यक्ष विकास धनगर यांच्या पत्नी भारताबाई धनगर या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. नशिराबाद मध्ये AIMIM ने प्रथमच निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते त्यात २ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले.

या निवडणुकीत नशिराबाद नगरपरिषदेतील विजयी तसेच पराभूत उमेदवार यांना किती मते मिळाली, मतमोजणीच्या ४ फेरी नुसार एकूण ९ टेबल लावण्यात आले. पहिल्या फेरीत टेबल क्रमांक १,२,३ वर प्रभाग १ , टेबल क्रमांक ४,५ वर प्रभाग २, टेबल क्रमांक ६,७,८,९ वर प्रभाग 3, ची मतमोजणी करण्यात आली. दुसऱ्या फेरीत टेबल क्रमांक १,२,३ वर प्रभाग ४, टेबल क्रमांक ४,५ वर प्रभाग ५, टेबल क्रमांक ६,७ वर प्रभाग ६ ची मतमोजणी झाली. तिसऱ्या फेरीत टेबल क्रमांक १,२,३,४ वर प्रभाग ७, टेबल क्रमांक ५,६,७ वर प्रभाग ८ ची मतमोजणी झाली. तर चौथ्या फेरीत टेबल क्रमांक १,२,३,४,५ वर प्रभाग ९, टेबल क्रमांक ६,७,८,९ वर प्रभाग १० ची मोजणी पूर्ण झाली.या मतमोजणीत प्रत्येक फेरी नुसार प्रभाग नुसार विजयी उमेदवार तसेच पराभूत उमेदवार यांना मिळालेली मते त्यातील फरक सविस्तर तक्त्यानुसार मांडणी करून दर्शविला आहे.

नशिराबाद नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठीची मतमोजणी फेरी नुसार:-

नशिराबाद नगरपरिषद नगरसेवक पदासाठीची मतमोजणी प्रभागानुसार:-

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या