Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावछत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविंत पाटील होते. याप्रसंगी भारतीय महान गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. जगदीश निमकर यांनी राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी रामानुजन यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत गणित विषयातील संशोधन, नवकल्पना तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गणित हा केवळ अभ्यासाचा विषय नसून दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास डॉ. विश्वनाथ महाजन, प्रा. विजय भोई, प्रा. माधुरी पाटील, ग्रंथपाल गायत्री भांडारकर, लिपिक सागर मोरे तसेच विद्यार्थी-शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. गणित विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व ओळखावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या