Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी : मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघड, १...

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी : मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघड, १ आरोपी अटकेत

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरात वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक आरोपी अटक केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, पोहेका संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोको राहुल कोळी व चालक पोहेका दिपक चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे संशयित विकास चंपालाल बरडे (रा. अंजनगाव, ता. संधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यास शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने जळगाव शहरातील विविध ठिकाणांहून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार अभिलेख तपासणी केली असता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुरनं. ३९०/२०२५ व ३८२/२०२४ तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरनं. १५/२०२५, सर्व BNS ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या तिन्ही गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली आरोपीकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीस पुढील तपासासाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पोहेका उमेश भांडारकर पुढील तपास करीत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या