Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईममच्छीमार्केट, तांबापुरा परिसरात गांजाची चोरटी विक्री ; एमआयडीसी पोलिसांच्या छाप्यात ३.२२ किलो...

मच्छीमार्केट, तांबापुरा परिसरात गांजाची चोरटी विक्री ; एमआयडीसी पोलिसांच्या छाप्यात ३.२२ किलो गांजा जप्त, तरुण अटकेत

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तांबापुरा येथील मच्छीमार्केट परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात गांजा बाळगणाऱ्या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात पकडून ३ किलो २२० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शेख अशपाक शेख मेहमूद (वय २३, रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय बातमी मिळाली की तांबापुरा परिसरात एक इसम गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात गांजा साठवून ठेवत आहे. त्यानुसार खात्री करून तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

पोउपनिरी चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी, पोकॉ. गणेश ठाकरे, पोकॉ. शशिकांत मराठे, पोका राहुल घेटे यांचे पथक शासकीय वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. मच्छीमार्केटजवळ वाहन उभे करून पायी एका गल्लीतील घरात डोकावले असता एक तरुण हातात गोणी घेऊन बसलेला आढळून आला. चौकशीत त्याने आपले नाव शेख अशपाक शेख मेहमूद असल्याचे सांगितले. गोणीत काय आहे असे विचारताच त्याने गांजा असल्याची कबुली दिली. त्यानंतर छापा कारवाईसाठी फोटोग्राफर, वजनकाटाधारक, फॉरेन्सिक तज्ज्ञ व दोन पंचांना घटनास्थळी बोलावून घेतले. पाहणीत सदर गोणीत ३ किलो २२० ग्रॅम वजनाचा, प्रतिकिलो ६ हजार रुपये दराने एकूण १९ हजार ३२० रुपये किमतीचा गांजा आढळून आला. जप्ती पंचनामा करून गांजा व आरोपी ताब्यात घेण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनिरी चंद्रकांत धनके व पोका चेतन पाटील करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गणेश वाघ, पोउपनिरी राहुल तायडे, पोउपनिरी चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या