Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगावात भरवस्तीत सुरू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त ; दोन पीडित महिलांची सुटका, चालक...

जळगावात भरवस्तीत सुरू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त ; दोन पीडित महिलांची सुटका, चालक जेरबंद!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश्वर नगर परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सोमवारी सायंकाळी पोलिसांनी धडक कारवाई करत देहविक्रीत अडकवलेल्या दोन महिलांची सुटका केली असून कुंटणखाना चालवणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे.
कुंटणखाना सुरू असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. माहितीची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठविण्यात आला. संबंधित घरात पंधराशे रुपयांत सौदा ठरल्यावर पंटरने मोबाईलवर ‘मिस कॉल’ देत बाहेर दबा धरून बसलेल्या पथकाला इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घराला घेराव घालत छापा टाकला.

या कारवाईत कुंटणखाना चालवणारा मुख्य सूत्रधार ताब्यात घेण्यात आला असून दोन पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या बेकायदा प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष होता. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई पोहेका रविंद्र मोतीराया, आवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार तसेच महिला पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांच्या पथकाने केली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या