Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ : कायदा-सुव्यवस्थेसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज

जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ : कायदा-सुव्यवस्थेसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. शहरातील १९ प्रभागांमध्ये ७५ नगरसेवक पदांसाठी १६९ मतदान केंद्रांवर एकूण ५१६ मतदान बूथ उभारण्यात आले असून, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत.निवडणूक कालावधीत गैरप्रकार टाळण्यासाठी शस्त्र परवाना धारकांकडून आतापर्यंत एकूण २५१ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच शहरातील उपद्रवी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ९८ इसमांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव असून, त्यापैकी ७८ इसमांविरुद्धचा हद्दपार प्रस्ताव माननीय अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४९ अन्वये १५० इसमांना नोटीस देण्याचे प्रस्तावित असून, त्यापैकी ६१ इसमांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.निवडणूक बंदोबस्तासाठी ०९ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ६० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १,०७० पुरुष पोलीस अंमलदार, १३७ महिला पोलीस अंमलदार, ०८ दंगा नियंत्रण पथके, ०२ शीघ्र प्रतिसाद दल, ०१ एसआरपीएफ कंपनी तसेच १,१०० होमगार्ड असा भक्कम पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

जळगाव शहरात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस दल पूर्णतः सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या