Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव महापालिकेत माघारीनंतर महायुतीला १२ जागांवर बिनविरोध विजय

जळगाव महापालिकेत माघारीनंतर महायुतीला १२ जागांवर बिनविरोध विजय

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपताच महायुतीच्या तब्बल १२ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये भाजपचे ६ तर शिवसेना (शिंदे गट) चे ६ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.महापालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी १०३८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर ९०३ अर्ज वैध ठरले. १ व २ जानेवारी या दोन दिवसांत माघार प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काही प्रभागांतील जागा थेट बिनविरोध झाल्या. त्यात महायुतीच्या १२ जागांचा समावेश आहे.

 

भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
प्रभाग ७ (अ) – दिपमाला काळे,
प्रभाग ७ (ब) – अंकिता पाटील,
प्रभाग ७ (क) – विशाल भोळे,
प्रभाग १२ (ब) – उज्ज्वला बेंडाळे,
प्रभाग १३ (क) – वैशाली अमित पाटील,
प्रभाग १६ (अ) – डॉ. विरण खडके.

शिवसेना शिंदे गटाचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार 
प्रभाग २ (अ) – सागर सोनवणे,
प्रभाग ९ (अ) – मनोज चौधरी,
प्रभाग ९ (ब) – प्रतिभा गजानन सोनवणे,
प्रभाग १८ (अ) – डॉ. गौरव सोनवणे,
प्रभाग १९ (अ) – रेखा पाटील,
प्रभाग १९ (ब) – गणेश उर्फ विक्रम सोनवणे.

माघारीनंतर महायुतीने सुरुवातीलाच १२ जागांवर आघाडी घेतल्याने जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या