Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगाव14 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात कलम 37 लागू ; सभा-मिरवणुका, शस्त्र बाळगणे व प्रतिमा...

14 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात कलम 37 लागू ; सभा-मिरवणुका, शस्त्र बाळगणे व प्रतिमा दहनावर कडक बंदी!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी, तसेच विविध सण-उत्सव व थोर पुरुषांच्या जयंतींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 00.01 वाजेपासून ते दि. 14 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत कोणालाही शस्त्र बाळगणे, स्फोटके किंवा इतर धोकादायक वस्तू वापरणे, प्रतिमा दहन करणे तसेच पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, सरकारी कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्नसमारंभ व धार्मिक मिरवणुका, तसेच शासन सेवेत कार्यरत असून वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे.नागरिकांनी या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या