Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeरावेरभव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ; सावदा येथे पत्रकार दिनानिमित्त विशेष...

भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ; सावदा येथे पत्रकार दिनानिमित्त विशेष उपक्रम.

रावेर-सावदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-
पत्रकार दिनाचे औचित्य साधत ओरिजनल पत्रकार संघ, सावदा व गोदावरी फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी सावदा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर जेहरा मॅरेज हॉल, रावेर रोड, सावदा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाद्वारे रुग्णांची तपासणी, सल्ला व आवश्यक उपचार मार्गदर्शन केले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे..
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
रेशन कार्ड (पिवळे / केसरी / अन्नपूर्णा / अंत्योदय)
आधार कार्ड
आयुष्यमान भारत कार्ड (असल्यास त्याची प्रत)

शिबिरात होणाऱ्या प्रमुख शस्त्रक्रिया व उपचार सल्ला…
स्वादुपिंड (पॅनक्रियास) संबंधीत आजार
लहान गाठी (ट्यूमर / सिस्ट) काढणे
मुळव्याध (पाइल्स), हायड्रोसिल
अंडाशय शस्त्रक्रिया
भांड (हर्निया)
पित्ताशयातील खडे (गॉलस्टोन)
पायातील शिरा फुटणे (व्हेरिकोज व्हेन्स)
मूत्रपिंडाचे आजार
पोट व आतड्यांच्या शस्त्रक्रिया आदी.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सावदा येथील ओरिजनल पत्रकार संघाने हा उपक्रम हाती घेतला असून, या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आवाहन करणारे पदाधिकारी..
अध्यक्ष – भानुदास भारंबे
उपाध्यक्ष – दिलीप चांदेलकर
सचिव – शेख फरीद
कार्याध्यक्ष – युसुफ शहा
कैलास लवंगडे, प्रसिद्धी प्रमुख – अजहर खान, दीपक श्रावगे, शेख मुखतार, प्रशांत सरवदे, अकरम खान
या शिबिरास नगरसेवक, विविध अधिकारी, स्थानिक पत्रकार तसेच रावेर, यावल तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या