Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यनशिराबाद येथे ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’चा शुभारंभ

नशिराबाद येथे ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’चा शुभारंभ

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. १५ जानेवारी २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद येथे ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’ चा शुभारंभ माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते करण्यात आला. माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या सूचनेनुसार या अभियानासाठी एकूण ४२ पथकांची (टीम्स) नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण कार्यक्षेत्रात सर्वेक्षण, तपासणी व उपचार करून मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या विशेष अभियानांतर्गत ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, सर्वेक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांची सिकलसेल तपासणी केली जाणार आहे.अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, माननीय नगरसेवक, रुग्ण कल्याण समितीचे डॉ. प्रमोद आमोदकर, न्यू इंग्लिश स्कूलचे प्रतिनिधी महाजन सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयपाल सिंग, डॉ. गौरव जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय पाटील, डॉ. विकास जोशी, डॉ. तुषार राणे, डॉ. शोएब पटेल, तसेच आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, फार्मासिस्ट अधिकारी, गटप्रवर्तक व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उद्घाटनावेळी उपस्थित नागरिक व किशोरवयीन मुलींना सिकलसेल आजाराबाबत माननीय डॉ. सचिन भायेकर यांनी सविस्तर माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले. या अभियानामुळे सिकलसेल व अ‍ॅनिमिया आजाराबाबत जनजागृती वाढून अधिकाधिक नागरिक तपासणीसाठी पुढे येतील, असा विश्वास आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या