Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद येथे जुन्या वादाचा स्फोट : दोन गटांत तुफान हाणामारी ; १६...

नशिराबाद येथे जुन्या वादाचा स्फोट : दोन गटांत तुफान हाणामारी ; १६ जण जखमी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरात जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने रविवारी सायंकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. लाठ्याकाठ्या, लोखंडी पाइप तसेच कुऱ्हाडीचा वापर करत करण्यात आलेल्या मारहाणीत दोन्ही गटांतील एकूण १६ जण जखमी झाले. विशेष म्हणजे, पोलिस ठाणे व रुग्णालय परिसरातही वाद वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.नशिराबादमध्ये काही दिवसांपूर्वी दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी इस्लामपुरा भागात सुरू असलेल्या न्यासाच्या कार्यक्रमादरम्यान अचानक मोठा जमाव जमा झाला. जमावातील काही जणांनी दगडफेक सुरू करत लाठ्याकाठ्या व लोखंडी पाइपने हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हिंसाचारामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली.या हाणामारीदरम्यान कुऱ्हाडीच्या वारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर जखमी तक्रार देण्यासाठी नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल झाले असता तेथेही दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.यानंतर जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय परिसरातही दोन्ही गटांतील वाद पुन्हा उफाळून आला, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शहरातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नशिराबाद पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी मध्यरात्रीपर्यंत गावात पोलिस कर्मचाऱ्यांसह गस्त घालत शांतता राखण्याचे प्रयत्न केले. घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दगडफेकीतील जखमीजमावाने केलेल्या हल्ल्यात शेख अमीन शेख बाबु (वय ४५), अब्दुल महेमूद अब्दुल गनी (वय ५६), मोईल अब्दुल रऊफ (वय २२), आकीब नवाब अब्दुल महेमुद (वय २८), रिजवान रऊफ खान (वय २८), आवेश जहांगीर शेख (वय २४), अबुजर जहाँगीर शेख (वय २०), सैय्यद नावीद सैय्यद आरिफ (वय २२), सैय्यद आसिफ सैय्यद रशीद (वय ४२), हसनैन सैय्यद आरीफ (वय १४), मुश्ताक शेख नवीद (वय १६), गुलाम मोहम्मद अली (वय २१), दानिश सैय्यद रफिक (वय २३), आरीफ अली रशीद अली (वय ४७), रजिया जुल्फीकार अली (वय ४७), शेख मुस्तकीम शेख अन्वर (वय ३०) हे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या