संपादक चंदन पाटील मो. नं:-9850168194
जळगाव /पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-जळगावात गेल्या काही दिवसांपासून खुनाचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पून्हा खून झाल्याची घटना शहरात गोलाणी मार्केटमध्ये घडली आहे. बाचाबाची रूपांतर वादात झाल्याने ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
यावल व जामनेर तालुक्यातील खून प्रकरण नंतर रविवारी रात्री 10 वा.पुन्हा एक खून झाला झाल्याने जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून खुनाचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या तिन्ही खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात मात्र पोलिसांना यश आले आहे. प्राथमिक माहिती अशी की रविवारी गोलाणी मार्केटमध्ये तळ मजल्यावर रात्री ९.३० च्या सुमारास काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर रात्री १०.१५ च्या सुमारास त्यातील एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय,वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविला. मयताची ओळख अद्याप नसून तपास सुरू आहे.