Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद: नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

नशिराबाद: नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळ व न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच नशिराबाद शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, उपकार्याध्यक्षा प्रमिला महाजन, अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, उपाध्यक्ष विनायक वाणी, सचिव मधुकर चौबे, संचालक गोविंदा भोळे, राजेंद्र पाटील, भोजराज पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे, संचालिका सुनिता पाटील, नेहा जनरल स्टोअर्सचे संचालक संजय चौधरी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रविण महाजन तसेच माध्यमिक विभागाचे उपशिक्षक जे. वाय. महाजन व आर. एल. पाचपांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस व संस्थेचे माजी कार्याध्यक्ष स्व. वाय. जी. महाजन सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संचालक मंडळ, संजय चौधरी तसेच प्राथमिक विभागाच्या वतीने योगेशजी पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. औक्षण करून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी मनोगत व्यक्त करताना योगेश पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यानंतर मंगला पिंगळे, मुख्याध्यापक प्रविण महाजन तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन माळी यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त व पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन दिपाली माळी व ममता महाजन यांनी केले असून, त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या