Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापोलीस दक्षता लाईव्हच्या वृत्ताची तासाभरात दखल : नशिराबाद नगरपरिषदेची कामात तत्परता ;...

पोलीस दक्षता लाईव्हच्या वृत्ताची तासाभरात दखल : नशिराबाद नगरपरिषदेची कामात तत्परता ; नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद-उमाळा रोडवरील के.एस.टी. उर्दू शाळेजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत पोलीस दक्षता लाईव्हने काल दुपारी ३ वाजता वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच संबंधित अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांना याबाबत तात्काळ संदेशाद्वारे अवगत करण्यात आले होते.

पोलीस दक्षता लाईव्हच्या वृत्ताची नशिराबाद नगरपरिषदे कडून तत्काळ दखल.
पोलीस दक्षता लाईव्ह ने दिलेल्या या वृत्ताची तातडीने दखल घेत नशिराबाद नगरपरिषदेने अवघ्या ५० मिनिटांत, म्हणजेच दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी, उमाळा रोडवरील उताराच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने चारी खोदून गटारीच्या पाण्याचा योग्य मार्ग मोकळा केला व रस्त्यावर वाहणारे सांडपाणी पूर्णतः बंद केले.उताराच्या भागात, मशिदीजवळ व उर्दू शाळेच्या परिसरात साचणारे गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढल्या होत्या. नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागत होते. मात्र वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपरिषदेने दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे.

काम सुरू असतांनाचा फोटो.

नगरपरिषदेने तत्पर केलेल्या कामा विषयी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण.
नशिराबाद नगरपरिषदेने वेगाने कारवाई करून काम पूर्ण केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ही तत्काळ कृती नगरपरिषदेच्या कामकाजातील एक सकारात्मक व आशादायी सुरुवात असल्याची भावना नगरवासियांतून व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांनी पोलीस दक्षता लाईव्हच्या प्रतिनिधींशी संवाद साधत नगरपरिषदेच्या तत्परतेचे स्वागत केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे लोकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या