जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह :- स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार केलेल्या कारवाईत चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त केल्या असून याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल दोन गुन्हे तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथे दाखल एका गुन्ह्यातील एकूण तीन मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत.
या कारवाईत आरोपी अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरिओम नगर, जामनेर) व दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने सदर मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींमध्ये जामनेर पोलिस स्टेशन येथील दोन मोटरसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथील एक मोटरसायकल यांचा समावेश आहे.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तसेच आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, तसेच हेड कॉन्स्टेबल गोपाळ गव्हाडे, उमाकांत पाटील आणि पोलीस नाईक विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली

