Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नशिराबादमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार यांचे दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती (जि. पुणे) येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून,या पार्श्वभूमीवर नशिराबाद येथे दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मंगलमूर्ती मंगल कार्यालय, मोठ्या बोगद्याजवळ, सुनसगाव फाटा, नशिराबाद येथे पार पडली.

सदर श्रद्धांजली सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले होते. जिल्हा कार्याध्यक्ष (जळगाव लोकसभा) सैय्यद बरकत अली व नशिराबाद शहर अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी नशिराबाद नगरपरिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला सर्व उपस्थितांनी मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर
सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याच्या सामाजिक, राजकीय व लोकहितकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या