Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमबंद घर फोडून सोन्याचे दागिने लंपास करणारे आंतरराज्य गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लंपास करणारे आंतरराज्य गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक करून मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व साहित्य जप्त करण्यात आले आहे.आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे आपल्या परिवारासह मूळ गावी धानवड येथे गेले असताना, त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती शेजाऱ्यांनी फोनद्वारे दिली. त्यानंतर पाटील कुटुंब जळगावला परत आल्यानंतर घराची पाहणी केली असता लाकडी कपाट फोडलेले असून ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक नेमण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हवालदार किरण चौधरी, कॉन्स्टेबल विशाल कोळी यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.त्यानुसार पथकाने मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पुनासा तालुक्यातील इनपुन पुनर्विकास परिसरात सापळा रचून दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी १) सुखदेव रामसिंग टाक (वय ३६) आणि २) आकाश दिनेश वाधे (वय १९) दोन्ही रा. इनपुन पुनर्विकास, ता. पुनासा, जि. खंडवा (मध्यप्रदेश) तसेच एका विधीसंघर्ष बालकाने गुन्हा केल्याची कबुली दिली.आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले सुमारे ४ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, लोखंडी पकड (पेंचिस), स्क्रू ड्रायव्हर व लहान चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या