Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमगोवंश मांसाची अवैध वाहतूक करतांना रिक्षाचालकास अटक ; ७० किलो मांस जप्त

गोवंश मांसाची अवैध वाहतूक करतांना रिक्षाचालकास अटक ; ७० किलो मांस जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव-भुसावळ रोडवरून रिक्षाच्या माध्यमातून गोवंश मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकास एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ७० किलो गोवंश मांस व वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील स्वामी नारायण मंदिरासमोर, दूरदर्शन टॉवर परिसरात एमआयडीसी पोलिसांनी संशयास्पद रिक्षाची तपासणी केली. तपासणीदरम्यान रिक्षामध्ये गोवंश जनावरांच्या मांसाचे लहान तुकडे करून विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी शेख जमीर मेहबूब (वय ५४, रा. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून बजाज कंपनीची रिक्षा (क्र. MH-19-V-7745) व अंदाजे ७० किलो गोवंश मांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात राजेंद्र उगले, रामदास कुंभार, गिरीश पाटील, विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी व विनोद आस्कर यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या