Sunday, February 15, 2026
police dakshta logo
Homeजळगावपी. ई. तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘पांडुरंग प्रभा’ मासिकाचे...

पी. ई. तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘पांडुरंग प्रभा’ मासिकाचे प्रकाशन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पी. ई. तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, पी. ई. तात्या पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच पी. ई. तात्या पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या शैक्षणिक संस्थांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व ‘पांडुरंग प्रभा’ वार्षिक मासिक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजू मामा भोळे, गुलाबराव आप्पासाहेब देवकर, उज्वलाताई बेंडाळे, सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड चे उपाध्यक्ष सुरेशजी मंत्री, डॉ. सुरेश पाटील, आदेश लालवाणी, किड्स गुरुकुल, सुभाषजी साखला, नूतन मराठा महाविद्यालय चे माजी प्राचार्य अजित वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संस्थेचे पदाधिकारी निर्मलाताई पाटील, राहुल पाटील व भूषण पाटील यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमात विविध महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. सुधांशु सिंग, डॉ. मनीषा टोनपे, डॉ. समिक्षा वारके तसेच मनीषा बडगुजर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गीत-गायन, कविता वाचन तसेच वाद्य सादरीकरणाद्वारे आपली कला सादर केली. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित नाटकाने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.मान्यवरांनी आपल्या भाषणातून तात्या पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पी. ई. तात्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या