Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळ: फेकरी उपकेंद्रात आशा वर्करांना घेराव ; ७ जणांसह अनोळखी ५ ते...

भुसावळ: फेकरी उपकेंद्रात आशा वर्करांना घेराव ; ७ जणांसह अनोळखी ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप..

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील फेकरी उपकेंद्रात आशा वर्करांना घेराव घालून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सात जणांसह पाच ते सहा अनोळखी महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.याबाबत गंगा भारत नांदुरकर (वय ५३, व्यवसाय – आशा वर्कर, रा. झे. टी.सी. फेकरी, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता त्या व इतर आशा वर्कर फेकरी उपकेंद्रात वाऊचर तपासणीसाठी गेलेल्या असताना आरोपींनी तेथे येऊन त्यांना घेराव घातला. शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच तक्रार मागे घेण्याची जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी सुजाता अशोक बागुल, प्रियंका आबेडकर, प्रियंका आबेडकर यांचे पती (नाव व गाव अज्ञात), कल्पना प्रविण बोदडे, प्रविण बोदडे (पूर्ण नाव अज्ञात), विमल महेंद्र तायडे तसेच पाच ते सहा अनोळखी महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मागील आठ महिन्यांपासून संबंधितांकडून त्रास दिला जात होता. याबाबत आरोग्य जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी बाहेरील व्यक्तींना बोलावून दबाव टाकण्यात आला, तसेच धमकावण्यात आल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकारामुळे सर्व आशा वर्कर भयभीत झाल्या असून जीवितास धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.महेश चौधरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या