Saturday, March 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामुक्ताईनगर बाजारपेठेतील चोरीचा गुन्हा उघड ; १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर बाजारपेठेतील चोरीचा गुन्हा उघड ; १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद आहे.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुक्ताईनगर शहरातील बाजारपेठ परिसरात चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयिताचा माग काढला.त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चांदीचे दागिने रोख रक्कम, असा एकूण १,९२,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास मुक्ताईनगर बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून सुरू असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या