Friday, March 13, 2026
police dakshta logo
Homeजळगावचर्मकार महिला संघातर्फे जळगावात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

चर्मकार महिला संघातर्फे जळगावात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

जळगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- चर्मकार महिला संघातर्फे रविवार, ८ मार्च रोजी संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह, गिरणा पंपिंग रोड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून एकपात्री अभिनय सादर केला. या सादरीकरणासाठी उज्वला वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री विसावे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सुरेखा तायडे, भारती बाविस्कर, ‘सकाळ सन्मान’ पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका उज्वला वाडेकर आणि ज्योती निंभोरे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व महिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रा. मीनाक्षी वाघमारे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून ‘मी सावित्री बोलतेय’ या विषयावर प्रभावी एकपात्री अभिनय सादर करत त्यांच्या जीवनकार्याची माहिती मांडली. कार्यक्रमात नगरसेविका सुरेखा तायडे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी विविध क्षेत्रांत उत्तम कार्य करून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती निंभोरे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. हेमाक्षी वानखेडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रतिभा बाविस्कर यांनी केले तर आभारप्रदर्शन सुशीला मोरे यांनी मानले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संत रोहिदास प्रतिष्ठान व गुरु रविदास क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच शारदा वानखेडे, वसुंधरा भवरे, लीना बाविस्कर, स्मिता गवळी, ज्योती शिरसाठ, सुनीता टेमकर, सुनीता अहिरे, मंगला वाघ, जयश्री बाविस्कर, ज्योती सोनवणे, सुषमा निंबाळकर, जयश्री वानखेडे, लता वानखेडे, अपूर्वा बाविस्कर आदींनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या