Saturday, March 14, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव ; पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या...

जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव ; पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्य बजावताना दाखविलेल्या उत्कृष्ट कामगिरी, कर्तव्यनिष्ठा व तत्परतेची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. आपल्या कर्तव्याच्या पालनात दाखविलेल्या धाडस, दक्षता आणि प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठे योगदान मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करत नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहनही करण्यात आले.या सन्मानामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या