Monday, March 16, 2026
police dakshta logo
Homeजळगावनाशिक उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षकांच्या थकीत बिलांना सरसकट नकार ; जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये...

नाशिक उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षकांच्या थकीत बिलांना सरसकट नकार ; जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये संभ्रम

नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- उपसंचालक कार्यालय, नाशिक विभाग (DYD) यांनी जिल्हा परिषद शिक्षकांच्या थकीत बिलांबाबत पाठविण्यात आलेली सर्व बिले एकत्रितपणे रिजेक्ट केल्याची बाब समोर आल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत वेतन अधीक्षक तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संबंधित थकीत बिलांमधील त्रुटी तपासून त्या दुरुस्त केल्यानंतर बिले नियमानुसार उपसंचालक कार्यालयाकडे सादर केली होती. मात्र, कोणत्याही प्रकारच्या स्पष्ट त्रुटींचा उल्लेख न करता ही सर्व बिले सरसकट नाकारण्यात आल्याने संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये काही प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी घाबरून न जाता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बिले पुन्हा विहित नमुन्यात तयार करून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, वेतन अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधितांनी आपल्या बिलांची हार्ड कॉपी वेतन पथक विभाग, जळगाव येथे सादर करावी. तसेच कोणत्याही शंका असल्यास संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधून शंका निरसन करून घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या