Wednesday, March 18, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानातवाच्या बारशानिमित्त मुख्याध्यापिका आजीकडून विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

नातवाच्या बारशानिमित्त मुख्याध्यापिका आजीकडून विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील सुनसगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना एकनाथ पाटील यांनी आपल्या नातवाच्या बारशानिमित्त एक आदर्श उपक्रम राबवत शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले.श्रीमती पाटील यांच्या कन्या सौ. दिपाली धनंजय पाटील यांना पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्याचे नाव गौरांग असे ठेवण्यात आले आहे.

या आनंदाच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने समारंभ साजरा करण्याऐवजी त्यांनी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसोबत हा आनंद वाटण्याचा निर्णय घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना मिसळ, पाव, जिलेबी व फरसाण असे स्वादिष्ट स्नेहभोजन देण्यात आले.या परिसरात मुख्याध्यापिका आजीने नातवाच्या बारशानिमित्त विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिल्याची ही बहुधा पहिलीच घटना मानली जात असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. फटाके फोडणे व अनावश्यक खर्च करण्याऐवजी सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांसोबत आनंद साजरा करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

या कार्यक्रमासाठी उपशिक्षिका तायडे मॅडम, गालफाडे मॅडम, जगताप मॅडम तसेच रत्नाबाई कंकरे व सुरेखा कंकरे यांनी सहकार्य केले. यावेळी उपसरपंच एकनाथ सपकाळे व पत्रकार जितेंद्र काटे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या