Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनॅशनल इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न

नॅशनल इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथे फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पी. जी. कुमावत प्रतिष्ठान, नशिराबाद संचलित नॅशनल इंग्लिश स्कूल येथे एक दिवसाचा फूड फेस्टिवल उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच व्यवहारज्ञान, पैशांची देवाण-घेवाण व बाजारभाव यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या फेस्टिवलमध्ये शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी तब्बल ३५ खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. स्टॉलवर राजस्थानची दाल-बाटी, इडली-सांबार, गुलाब जामुन, पाणीपुरी, वडा-पाव, थंडगार मठ्ठा, चना मसाला, सोयाबीन वडी, ढोकळा, ब्रेड सँडविच, मंचुरियन, आइस्क्रीम, मॅंगो ज्यूस, भेळ, केळीची चिप्स आदी विविध चविष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली.

या उपक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. संगीता शाम कुमावत यांच्यासह सुवर्णा प्रताप कुमावत, धनश्री दीपक लोखंडे, निकिता जाधव, दीपाली राहुल पाटील, कोमल पाटील, अश्विनी माळी व मोनाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय कसा करावा, ग्राहकांशी संवाद कसा साधावा व व्यवहार कसा पार पाडावा याचे मार्गदर्शन केले.

फूड फेस्टिवलला संस्थेचे अध्यक्ष श्याम कुमावत, सचिव प्रताप कुमावत, पोलीस दक्षताचे संपादक चंदन पाटील, साईमत तसेच मंडे टू मंडेचे जळगाव ग्रामीणचे पत्रकार दीपक लोखंडे, शैलेश गजरुषी, राहुल पाटील, विक्की बोढरे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.
हा फूड फेस्टिवलचा दुसरा वर्ष असल्याचे सांगून, यंदाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुढील वर्षी याहून अधिक भव्य स्वरूपात फेस्टिवल आयोजित करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे सचिव प्रताप कुमावत यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या