Saturday, March 21, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद येथील इस्लामपुरा भागात अवैध गोवंश मांस विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

नशिराबाद येथील इस्लामपुरा भागात अवैध गोवंश मांस विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

50 किलो वजनाच्या सुमारे 10 हजार रुपये किमतीच्या गोवंश सदृश्य मांसासह एक लोखंडी कोयता जप्त.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- इस्लामपुरा परिसरात अवैधरीत्या गोवंश सदृश्य जनावरांच्या मांसाची कत्तल करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 20 मार्च 2026) सायंकाळी सुमारे 4.45 वाजता करण्यात आली.पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण दिलीप लोहार (वय 32) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने इस्लामपुरा परिसरात छापा टाकला. यावेळी पोहेका अतुल महाजन, सागर बिडे व भरत बाविस्कर तसेच दोन पंच उपस्थित होते.

छाप्यामध्ये साबीर पटेवाले यांच्या बंद घरासमोर दोन इसम गोवंश सदृश्य मांस कोयत्याने कापत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे असलम खान अयाज खान कुरेशी (वय 34) व उमर खान अहमद खान (वय 27, दोघेही रा. निचवास मोहल्ला, नशिराबाद) अशी सांगितली.कारवाईदरम्यान आरोपींकडून अंदाजे 50 किलो वजनाचे सुमारे 10 हजार रुपये किमतीचे गोवंश सदृश्य मांस तसेच एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. तसेच मांसाचा नमुना वैज्ञानिक परीक्षणासाठी सीलबंद करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. उर्वरित मांस विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या