Saturday, March 21, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणगुढीपाडव्याच्या निमित्ताने नशिराबादच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; चार गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नशिराबादच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; चार गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर सामाजिक बांधिलकी जपत न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथील सन 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांनी (सवंगडी) एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या मित्रपरिवारातील आधार नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा संकल्प या माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.या अंतर्गत नशिराबाद येथील चार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. यात दिवंगत संजय बोदडे यांचे जुळे चिरंजीव मानस व मयांक यांचा समावेश असून, त्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी लागणारे गणवेश, वह्या, दप्तर तसेच शाळेची फी यांचा सर्व खर्च माजी विद्यार्थ्यांकडून केला जाणार आहे.

तसेच सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिरंजीव ज्ञानेश्वर यांचीही शैक्षणिक जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. ज्ञानेश्वर यांची आई जन्म देताना निधन पावली होती. याशिवाय इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या कुमारी खुशी हिचे आई-वडीलही हयात नसल्याने तिच्या शिक्षणाची जबाबदारीही माजी विद्यार्थ्यांनी उचलली आहे.या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दीर्घकालीन मदतीचा संकल्प करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दि. 19 मार्च रोजी नशिराबाद येथील सार्वजनिक वाचनालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.पा. उपाध्यक्ष पंकज महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.वि.का.सो. चेअरमन विनोद रंधे, डॉ. प्रमोद आमोदकर, संजय पाटील व मनोज नाईक उपस्थित होते.यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना यावर्षी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक ईसाने, अविनाश रणधीर, नितीन तारकस, नरेंद्र बोंडे, विकास येवले, गोकुळ मराठे, किशोर माळी, संतोष देवाग, विवेक बाविस्कर, संजय चौधरी, अनिल झटके, राजेंद्र नारखेडे, पराग चौधरी, नितीन चौधरी, चंद्रकांत फेगडे, प्रवीण रोटे, रमेश रोटे व संजय प्रजापती यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पांढरकर यांनी केले, तर आभार नागराज महाजन यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या