जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी आपल्या कलागुणांची प्रभावी छाप पाडली. तीन दिवस चाललेल्या या भव्य संमेलनात जगभरातील १९ देशांतील मराठी भाषिक सहभागी झाले होते.
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदतर्फे अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी बहारदार कातकरी नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींनी हा उत्कृष्ट सादरीकरण साकारला.या सादरीकरणामुळे नाशिकच्या रंगमंचावर जळगावचा झेंडा दिमाखात फडकला. बालरंगभूमी परिषद, मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत आणि प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या प्रयत्नातून या विद्यार्थिनींना ही संधी प्राप्त झाली होती. मिळालेल्या संधीचे सोने करत विद्यार्थिनींनी जोशपूर्ण सादरीकरण केले.
सादरीकरणानंतर मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनी डिंपल चौधरी, भूमिका चौधरी, रेणुका पवार, पूर्वी भावसार, चिन्मयी जंजाळकर, स्वरा महाजन, सुंदरम चिमकर, विद्या सपकाळे, चेतन धनगर, हर्षिता निकुंभ तसेच वादक मोहित सोनवणे, ललित पवार, वेदांत जडे, रोहन चव्हाण, सचिन महाजन आणि संघप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन व संचालिका निशा अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

