Tuesday, March 24, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याराज्यातील सेवावर्ग आदेश रद्द ; परिवहन विभागात मोठी प्रशासकीय हालचाल

राज्यातील सेवावर्ग आदेश रद्द ; परिवहन विभागात मोठी प्रशासकीय हालचाल

जळगाव आरटीओत शिस्तीवर भर; नवीन नियमांची अंमलबजावणी

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील परिवहन विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवावर्ग (डेप्युटेशन) संदर्भातील सर्व आदेश तातडीने रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. २० मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, प्रशासकीय कारणास्तव किंवा वैयक्तिक विनंतीवरून एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात करण्यात आलेल्या नियुक्त्या आता अमान्य ठरविण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे राज्यभरातील शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी परतावे लागणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांवरही या निर्णयाचा थेट परिणाम होणार असून, त्यांना तात्काळ मूळ ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (MAT) विविध प्रकरणांमध्ये दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सेवावर्ग प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रशासन अधिक सुसंगत व नियमबद्ध करण्याच्या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

जळगाव आरटीओत शिस्तीवर भर; नवीन नियमांची अंमलबजावणी

जळगाव : प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामकाज अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. यानुसार, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या निश्चित वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, कार्यालयीन कामकाजादरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याने ओळखपत्र स्पष्टपणे परिधान करणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.नागरिकांना सेवा अधिक वेगवान व सुलभ पद्धतीने मिळावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, या निर्णयामुळे कार्यालयीन कार्यप्रणालीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या