Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजळगावात रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग : गुन्हा दाखल

जळगावात रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग : गुन्हा दाखल

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/प्रमोद सोनार/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव येथील फुले मार्केटच्या परीसरात रिक्षा चालकाने एका हातगाडीवर कपडे विक्री करणाऱ्या महिलेशी (३४) अंगलट करीत तिला मोबाईल वरुंन अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रीक्षा चालका विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत 34 वर्षीय विवाहिता महिला जळगाव शहरात वास्तव्यास असून फुले मार्केट परीसरातील हातगाडीवर कपडे विक्रीचा व्यवसाय करते. घटना घडली त्या दिवशी रविवार, २ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रीक्षा चालक आसीफ शहा दिलावर शहा (फातीमा नगर, 36 खोल्या, जळगव) विवाहितेच्या हातगाडीवर आला व त्याने विवाहितेशी जवळीक साधत तिचा विनयभंग केला.त्यानंतर त्याने महिलेस मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून विनयभंग केला. रिक्षा चालका विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या