Friday, March 27, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव पोलीस दलाच्या श्वान पथकात ‘धुरंदर’ची भर; गुन्हे उकलण्यात ठरणार महत्त्वाची भूमिका

जळगाव पोलीस दलाच्या श्वान पथकात ‘धुरंदर’ची भर; गुन्हे उकलण्यात ठरणार महत्त्वाची भूमिका

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात नव्या श्वानाची भर पडली असून या श्वानाचे नाव “धुरंदर” असे ठेवण्यात आले आहे. गुन्हे शोध, तपास तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी “धुरंदर” महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.पोलीस तपास प्रक्रियेत श्वान पथकाचे विशेष महत्त्व असते. घटनास्थळावरील पुरावे शोधणे, संशयितांचा माग काढणे आणि गुन्हे उकलण्यात श्वानांची मदत प्रभावी ठरते. या पार्श्वभूमीवर “धुरंदर”चा समावेश पोलीस दलासाठी एक मोठी ताकद मानला जात आहे.

प्रशिक्षित “धुरंदर”च्या माध्यमातून गुन्हे उकलण्याचा वेग वाढण्यास मदत होणार असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यास पोलीस दलाला बळ मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या