Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळात ट्रकची धडक; जखमी गायीवर तात्काळ उपचार, अखेर प्राण वाचले

भुसावळात ट्रकची धडक; जखमी गायीवर तात्काळ उपचार, अखेर प्राण वाचले

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ येथे काल दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास आरपीडी रोडवरील लिम्पस क्लब परिसरात एका अज्ञात ट्रकने गायीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात गायीचे मागील दोन्ही पाय गंभीररीत्या तुटून ती जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गोरक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गायीला पाळधी येथील सिद्धी महागणपती गौ हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया व आवश्यक उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे गायीचे प्राण वाचवण्यात यश आले.उपचारानंतर गायीला पुढील निगा व उपचारासाठी पाळधी येथील सिद्धी महागणपती गौशाळेत ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण बचावकार्य व उपचार प्रक्रियेत वैभव वाघे, बल्लु वाघे यांच्यासह चेतन भंगाळे, बाळा मोरे, रोहित महाले, शुभम रुमकर, कृष्णा साळी, सागर मुरेलिया, विशाल ठाकूर, चिंटू, पंकज चौधरी, सागर भोई, लोकेश यादव, जीवन कोळी, अक्षय पाटील, अश्विन पाटील, गणेश शिंदे तसेच गौ हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

या घटनेतून जखमी प्राण्यांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात, याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. तसेच “गाईचे रक्षण केल्याचे पुण्य मोठे असते” ही उक्तीही यानिमित्ताने सार्थ ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या