Monday, March 30, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणमन्यारखेडा येथे ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जलयात्रेने शुभारंभ

मन्यारखेडा येथे ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जलयात्रेने शुभारंभ

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– विश्वातील एकमेव ग्रह, राशी व नक्षत्र मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मन्यारखेडा येथे शनिवार (दि. २८ मार्च) रोजी जलयात्रेने भव्य शुभारंभ झाला. हा सोहळा दि. २८ मार्च ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.आज काढण्यात आलेल्या जलयात्रेची सुरुवात चिमुकले राम मंदिर, नवीन बसस्थानक येथून करण्यात आली. ही यात्रा स्वातंत्र्य चौक, नेरी नाका, पांझरापोळ टाकी, तेली चौक, विठ्ठल मंदिर, भाग्यलक्ष्मी टेन्ट मार्गे कालिका माता मंदिर येथे समारोप करण्यात आला.

या जलयात्रेत भारतातील विविध पवित्र नद्यांचे तसेच समुद्राचे जल ५१ कलशांमध्ये भरून महिलांनी पारंपरिक वेशभूषेत कलशयात्रा काढली. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.यात्रेचे आकर्षण ठरले ते उंट, बग्गी तसेच मोटू-पटलू, तात्या विचू व डोरेमॉन यांच्या वेशातील बाहुल्या. याशिवाय गावातील १२ वर्षांपर्यंतच्या मुलींच्या लेझीम पथकाने आणि मुलांच्या ढोल पथकाने उपस्थितांचे मन वेधून घेतले.

या भव्य कलशयात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून धार्मिक वातावरणात उत्साहाची भर घातली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या