Monday, March 30, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअमळनेरात मनसेची मोर्चेबांधणी; गजानन राणे यांचे संघटन बळकटीसाठी ठोस निर्देश

अमळनेरात मनसेची मोर्चेबांधणी; गजानन राणे यांचे संघटन बळकटीसाठी ठोस निर्देश

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमळनेर शहरात आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

या बैठकीत पक्षाच्या आगामी धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गजानन राणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच स्थानिक पातळीवर जनतेशी संपर्क वाढवून विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहून पक्षाच्या विचारांचा प्रसार करावा, तसेच बूथस्तरापर्यंत संघटन उभारणी मजबूत करावी, असेही राणे यांनी सांगितले. आगामी काळात पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या वेळी जळगाव शहर जिल्हाध्यक्ष जमील भाई देशपांडे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे जळगाव महानगर अध्यक्ष किरण तयळे उपनगराध्यक्ष बंटी भाऊ तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे शहर सचिव निलेश भावसार तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे अमळनेरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या