बन्नात बुवा मित्र मंडळ व सामाजिक कार्यकर्ते मोहन माळी यांच्या पुढाकारातून उपक्रम
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-नशिराबाद येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम बन्नात बुवा मित्र मंडळ तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहन माळी (प्रहार जनशक्ती पक्ष, तालुकाध्यक्ष जळगाव ग्रामीण) यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हीच खरी समाजसेवा असल्याची भावना व्यक्त करत, अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

