Sunday, April 12, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशाळांकडून गणवेश-पुस्तकांसाठी सक्ती बंद; नियम मोडल्यास मान्यता रद्द – शिक्षणमंत्री दादा भुसे...

शाळांकडून गणवेश-पुस्तकांसाठी सक्ती बंद; नियम मोडल्यास मान्यता रद्द – शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा इशारा

RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केल्यास कडक कारवाई..! पालकांना मोठा दिलासा

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील शाळांनी पालकांना विशिष्ट दुकानातूनच गणवेश व पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शाळांकडून पालकांना ठरावीक दुकानातूनच गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने हस्तक्षेप करत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.विशेषतः Right to Education Act (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून पुस्तके किंवा गणवेशासाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही, असेही मंत्री भुसे यांनी ठामपणे सांगितले. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाईसह मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.याशिवाय, गणवेश धोरणाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, शाळांनी पाच वर्षांपर्यंत गणवेशामध्ये बदल करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पालकांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होणार आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, शाळांची मनमानी आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या