Monday, April 13, 2026
police dakshta logo
Homeअपघातनशिराबाद बायपासवर दुचाकी अपघात; गटारीच्या धाप्यावर आदळून चालक गंभीर जखमी

नशिराबाद बायपासवर दुचाकी अपघात; गटारीच्या धाप्यावर आदळून चालक गंभीर जखमी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव-नशिराबाद बायपास रोडवर लक्ष्मीनारायण हॉल पासून काही अंतरावर सर्व्हिस रोडवर सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. जळगावकडे येत असताना मोटारसायकल क्रमांक MP 68 ZD 5579 हिरो होंडा HF डिलक्स वरील चालकाची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड गटारीवरील धाप्यावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमी व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या