Saturday, April 25, 2026
police dakshta logo
Homeअपघातमध्यरात्री नशिराबाद पोलिसांची तत्परता; तेलगळतीमुळे संभाव्य अपघातांची मालिका टळली

मध्यरात्री नशिराबाद पोलिसांची तत्परता; तेलगळतीमुळे संभाव्य अपघातांची मालिका टळली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव बायपासवरील तरसोद फाट्याजवळ घडलेल्या एका धोकादायक प्रसंगात नशिराबाद पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे वाहन घसरण्याच्या घटना घडत असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एका जेसीबी यंत्रामध्ये बिघाड झाल्याने ते रस्त्यावरच थांबले. याच वेळी यंत्रातून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती होऊन ते मुख्य मार्गावर पसरले. हा मार्ग वेगवान वाहतुकीसाठी ओळखला जात असल्याने, अंधारात तेलाचे अस्तित्व लक्षात न आल्याने काही दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या.ही माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणतीही मदत येण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती टाकण्याचे काम सुरू केले.

पोलिसांनी केवळ तात्पुरती उपाययोजना न करता, बिघडलेले जेसीबी यंत्र सुरक्षित स्थळी हलवले जाईपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले. सुमारे तीन तास सुरू असलेल्या या कार्यवाहीदरम्यान रस्ता पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला.पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या मदतकार्यातून पोलिसांनी कर्तव्यदक्षतेचा आदर्श घालून दिला असून, त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य मोठ्या अपघातांची मालिका टळल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या