Saturday, April 25, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यहिवताप निर्मूलनासाठी सज्ज व्हा; “आता आपण करू शकतो, आता करायलाच हवे”

हिवताप निर्मूलनासाठी सज्ज व्हा; “आता आपण करू शकतो, आता करायलाच हवे”

नशिराबाद गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती रॅली

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी यावर भर देत आज नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “Driven to end malaria, now we can, now we must” या घोषवाक्यांतून नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. या निमित्ताने संपूर्ण नशिराबाद गावात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

हिवताप हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून, वेळेवर निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. याची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावपातळीवर सर्वेक्षण, ताप रुग्णांची तपासणी, रक्त तपासणी (RDT), आवश्यक औषधोपचार तसेच स्वच्छता मोहिमांवर विशेष भर देण्यात येत आहे.हिवताप प्रतिबंधासाठी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करणे, डास प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे आणि ताप आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाणे, असे महत्त्वाचे संदेश आरोग्य सेवकांनी नागरिकांना दिले.

या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या