Sunday, May 3, 2026
police dakshta logo
Homeपुणेनीता वायकोळे यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार’; डॉ.रवींद्र भोळे यांचे...

नीता वायकोळे यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार’; डॉ.रवींद्र भोळे यांचे कार्य स्फूर्तीदायक – ना. रवींद्र साठे

पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून समाजघडणीचा प्रेरणादायी उपक्रम आहे. त्यागमय व निष्काम कर्मयोगाच्या भावनेतून कार्य करणारे डॉ. रवींद्र भोळे यांचे कार्य अत्यंत स्फूर्तीदायक असल्याचे प्रतिपादन खादी व ग्रामोद्योग मंत्री (स्वतंत्र कार्यभार) नामदार रवींद्र साठे यांनी येथे केले.मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आणि ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान, क्रीडा मंत्रालय, नीती आयोग व एमएसएमई उद्यम मंत्रालय, भारत सरकार संलग्न संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, टिंबर मार्केट येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास वारके (उपाध्यक्ष, महाराष्ट्र लेवा महासंघ) होते. व्यासपीठावर सौ. ममता पाटील, रमेश सुरुंग, डॉ. भावार्थ देखणे, कृष्णा खडसे, जयश्री पाटील, विजय खर्चे, डॉ. हरी पाटील, प्रमोद सूर्यवंशी, सुभाष कट्यारमल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी नामदार साठे म्हणाले की, “समाजाप्रती देण्याची भावना जपून त्यागमय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच राष्ट्राची उभारणी होते.पुरस्कार हे प्रेरणेचे साधन असून त्यातून नवीन कार्यकर्ते घडतात.”प्रास्ताविकात डॉ. रवींद्र भोळे यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाच्या तत्त्वांनुसार पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांनी आयुष्यभर निःस्वार्थ सेवा केली असल्याचे सांगितले.दुग्धोत्पादन, निसर्गोपचार, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे यज्ञ, दान व तपाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रसंगी विविध क्षेत्रातील सुमारे ७० सामाजिक कार्यकर्त्यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये अकोल्याच्या नीता यशवंत वायकोळे यांचा समावेश असून त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान स्व. अजितदादा पवार, स्व. दिनकरराव भोळे, स्व. शंतनु गटणे व स्व. तुकाराम मदने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन एल. डी. साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष कट्यारमल यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या