Wednesday, September 23, 2026
police dakshta logo
Homeजळगावशेठ ला.ना.सा. विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शेठ ला.ना.सा. विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा व जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ध्वजारोहण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वार्षिक परीक्षा निकाल वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाने झाली. शाळेचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक सचिन देशपांडे, सु. वा. अत्रे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र वानखेडे, जेष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे तसेच पर्यवेक्षिका सौ. रमा तारे उपस्थित होते.यानंतर इयत्ता पाचवी ते नववीमधील सर्व तुकड्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शालेय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता आठवीसाठी असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्रीडा विभागात सॉफ्टबॉल या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याचाही सन्मान पदक, गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेतील विविध शैक्षणिक सुविधांची माहिती दिली व नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या