Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगाववीज पडून झालेल्या नुकसानीची खासदार खडसे यांनी केली पाहणी

वीज पडून झालेल्या नुकसानीची खासदार खडसे यांनी केली पाहणी

वीज पडून झालेल्या नुकसानीची खासदार खडसे यांनी केली पाहणी

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:– रामगड (मुक्ताईनगर) येथे वीज पडून झालेल्या नुकसानीची खासदार रक्षा खडसे यांनी पाहणी करून पंचनामा करणे बाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथे काल वीज पडून पशुधन मृत पावले ,त्यामध्ये दहा शेळ्यांचा समावेश होता. तर काही जखमी झाले असता झालेल्या नुकसानीची पाहणी करून, पंचनामा करण्याबाबत खासदार खडसे यांनी संबंधितांना सूचना केल्या.

यावेळी तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, सरपंच दत्ता पाटील, नंदलाल पाटील, अक्षय चौधरी व स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या